Ad will apear here
Next
कासव संवर्धनाचा सिंधुदुर्ग पॅटर्न
ऑलिव्ह रिडले कासवांची पिल्लेवेंगुर्ले : ऑलिव्ह रिडले जातीची कासवे हा सागरी अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक. अनेक कारणांमुळे ही कासवे दुर्मिळ होत चालली असल्याचे लक्षात घेऊन काही सजग नागरिकांनी त्यांच्या संवर्धनाचे शिवधनुष्य हाती घेतले. या कार्याचे परिणाम सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता दिसू लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात वेळास येथे भाऊ काटदरे आणि मित्रमंडळींनी गेली काही वर्षे कासव संवर्धनाचे काम जोमाने सुरू केले आहे. आता त्या कामात सिंधुदुर्ग पॅटर्नही तयार झाला आहे.

वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी समुद्रकिनारा हे आता प्रमुख कासव संवर्धन केंद्र बनले असून, सुहास तोरस्कर या कासवमित्राने कासव संवर्धनाचा जणू वसाच घेतला आहे. त्याचबरोबर देवगड तालुक्यात तांबळडेग समुद्र किनाऱ्यावरही गेली अनेक वर्षे हे काम निसर्गमित्र मंडळाच्या माध्यमातून सुरू आहे. यामुळे दुर्मिळ अशा ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे.

कासव संवर्धन मोहिमेबद्दल जनजागृतीसाठी किनाऱ्यावर लावण्यात आलेला फलक.सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले आणि देवगड समुद्रात प्रामुख्याने ऑलिव्ह रिडले, ग्रीन तर्टेल आणि हॉक्सबिल या जातीची कासवे आढळून येतात. गेल्या १५-२० वर्षांपासून ऑलिव्ह रिडले जातीची कासवे वेंगुर्ले आणि देवगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर अंडी घालण्यासाठी येत आहेत; पण स्थानिक नागरिकांकडून या अंड्यांचा खाण्यासाठी वापर होत होता. तसेच कुत्रे आणि अन्य जनावरांपासूनही या अंड्यांना धोका होता. त्यामुळे या कासवांच्या संख्यावाढीवर निर्बंध आले होते.

ऑलिव्ह रिडले कासवांच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी किनाऱ्यावर लावलेल्या जाळ्या.ऑलिव्ह रिडले कासवे म्हणजे सागरी अन्नसाखळीतील एक महत्त्वाचा घटक आहेत. ही कासवे समुद्रातील विविध घटकांवर अन्नासाठी अवलंबून असतातत आणि शार्कसारखे मासे या कासवांना खाऊन आपली उपजीविका करतात. त्यामुळे कमी होत चाललेल्या या कासवांचे संवर्धन होणे गरजेच होते. त्यासाठी वेंगुर्ले तालुक्यात वायंगणी आणि देवगड तालुक्यात तांबळडेग येथे कासव संवर्धनाचे प्रयत्न सुरू झाले. याचा पहिला प्रयोग सुमारे पंधरा वर्षांपूर्वी तांबळडेग येथे सागर मालडकर आणि त्यांच्या टीमने यशस्वी केला. हेच काम वायंगणी किनाऱ्यावर गेल्या काही वर्षांपासून सुहास तोरस्कर आणि मंडळी करत आहेत. तसेच गेल्या चार वर्षांपासून वायंगणीमध्ये कासव जत्रेसारखे कार्यक्रम आयोजित केले जात असल्याने पर्यटनदृष्ट्याही कासव संवर्धनाला महत्त्व आले आहे.

१३२ पिल्ले परतली स्वगृही
देवगड तालुक्यातील तांबळडेग समुद्रकिनारी तील निसर्गमित्र मंडळाच्या वतीने शुक्रवारी (२४ मार्च) पहाटे ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांच्या १३२  पिल्लांना समुद्रात सुखरूप सोडण्यात आले.  त्या वेळी वन्यजीव अभ्यासक प्रा. नागेश दप्तरदार, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष जगदीश मालडकर, सागर मालडकर, दिनेश धावडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VYZJBA
Similar Posts
सिंधुदुर्गात फेरफटका – भाग एक ‘करू या देशाटन’ सदरात आजपासून कोकणाची सैर करू या. सुरुवात सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून...
कविवर्य शेवरे साहित्य संमेलन २६ रोजी जामसंडेला देवगड (सिंधुदुर्ग) : तळकोकणात पहिली विद्रोही साहित्य चळवळ सुरू करणारे ज्येष्ठ विद्रोही कवी आ. सो. शेवरे तथा आबा यांचे गेल्यावर्षी निधन झाले. त्यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्ताने आ. सो. शेवरे स्मृती संयोजन समितीतर्फे २६ नोव्हेंबरला आ. सो. शेवरे स्मृती साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. हे संमेलन जामसंडे येथील नलावडे सभागृहात होईल
कूर्मसंवर्धनाला द्रुतगती... कासवांचे अधिवास मानवी हस्तक्षेपामुळे नष्ट होऊ लागल्यामुळे त्यांचं अस्तित्वही धोक्यात आलं आहे. अशा स्थितीत जगभरात अनेक संस्था कासव संवर्धनासाठी काम करत आहेत. त्यात आपल्या महाराष्ट्रातल्या संस्थांचाही समावेश आहे, ही अभिमानाची गोष्ट. या उत्साही प्रयत्नांमुळे कासव संवर्धनाला द्रुतगती येऊ लागली आहे. यंदा
देवगड पंचायत समितीने रचला इतिहास; सलग पाच वर्षे अव्वल कामगिरी देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड पंचायत समितीने पंचायत राज अभियानात महाराष्ट्रात दुसरा, तर कोकण विभागात पहिला क्रमांक पटकावून इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे यशवंत पंचायत राज अभियानात सलग पाच वर्षे अव्वल स्थानावर राहणारी देवगड ही एकमेव पंचायत समिती आहे. या पुरस्काराचे वितरण येत्या १३ एप्रिल रोजी मुंबईत होणाऱ्या सोहळ्यात राज्यपाल सी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language